पुणे महाराष्ट्र

धक्कादायक; पुण्यातील 6 नगरसेवकांना कोरोनाची लागण

पुण्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापाठोपाठ आता  विरोधी पक्षनेते यांच्यासह 6 नगरसेवकांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे.

महापौरांच्या संपर्कात आलेल्या नेते आणि अधिकाऱ्यांना होम क्वारंटाइन  होण्यास सांगण्यात आलं आहे. यात आयुक्तांसह अनेक ज्येष्ठ अधिकारी आणि राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. आत्तापर्यंत अधिकारी, नगरसेवक आणि पालिकेचे कर्मचारी अशा अंदाजे 200 जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of