Indurikar maharaj
महाराष्ट्र

इंदुरीकर महाराज देणार कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांना आव्हान

प्रसिध्द किर्तनकार इंदुरीकर महाराज विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांविरोधात इंदूरीकर महाराजांनाच रिंगणात उतरवण्याची खेळी भाजप खेळू शकते. अशी शक्यता देखील वर्तविली जात आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरांताना इंदुरीकर महाराजांचे आव्हान असणार असल्याचे देखील बोलले जात आहे.

भाजपची महाजनादेश यात्रा थोरातांचा बालेकिल्ला असलेल्या संगमनेरात पोहोचली होती. इंदुरीकर महाराज मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले दिसले. बराचवेळ दोघांमध्ये हितगुजही झाले. पण त्यामुळे मात्र सगळीकडे वेगळीच कुजबूज सुरू झाली आहे. इंदोरीकर महाराज संगमनेरमधून थेट बाळासाहेब थोरातांच्या विरोधात निवडणुक लढवणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र, याबाबत इंदुरीकर महाराज यांनी कोणताही दुजोरा दिलेला नाही. तरी धार्मिक संप्रदायातील लोक या गोष्टीच समर्थन करताना दिसत आहेत.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of