महाराष्ट्र

दिग्गज नेते असलेल्या नागपुरात भाजपचा पराभवः जयंत पाटील

दिग्गज नेते असलेल्या नागपुरात भाजपाचा पराभव झाला असल्याची टीका राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.

जिल्हा परिषद निवडणूकीमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे भाजपाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादीनं सुरुंग लावला आहे.

जयंत पाटील यांनी भाजपाला चिमटे काढले आहेत. “राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांना जिल्हा परिषद निवडणुकीत चांगले यश मिळाले आहे. नागपूर जिल्हा परिषद निवडणूक वारंवार पुढे ढकलली जात होती. भाजपा निवडणूक टाळत होती. मात्र, आज निवडणूक झाली. जनतेनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या पारड्यात आपले मत टाकले. विदर्भात भाजपाचा आज पराभव झाला आहे. ज्या नागपुरात भाजपाचे दिग्गज नेते आहेत. जिथे भाजपाची चांगली पकड होती. त्याच नागपुरात भाजपाचा पराभव झाला आहे,” असा टोला पाटील यांनी लगावला आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of