महाराष्ट्र

जिद्दीला सलाम ! आधी कोरोना टेस्ट किटला जन्म नंतर बाळाला जन्म

कोरोणा विषाणूच्या चाचणीसाठी भारतात पहिलं कोरोना किट तयार करण्यात आलं. हे किट अवघ्या सहा आठवड्यात करण्यात आलं. पुण्याच्या मायलॅब मध्ये हे किट तयार करण्यात आलं आहे. याच माय लॅबच्या टीमध्ये काम करणाऱ्या पुण्याच्या मिनल दाखवे भोसले यांनी 9 महिन्यांची गर्भवती असताना देखील त्यांनी हे किट तयार केलं आहे. त्यानंतर त्यांनी गोंडस बाळाला जन्म दिला आहे. आता सर्व स्तरातून मिनल दाखवे भोसले यांचे कौतुक होत आहे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील मिनल भोसले यांच्या कामाचं कौतूक केलं आहे. यासंर्भात त्यांनी एक ट्वीट केले आहे, त्यात ते म्हणाले की,’त्यांनी आधी भारतातील पहिलं कोरोना टेस्ट किट जन्माला घातलं आणि नंतर स्वतःच्या बाळाला जन्म दिला. पुण्याच्या डॉ. मीनल दाखवे भोसले यांचे अनंत आभार. अशा कर्तव्यनिष्ठ माणसांसमोर मान आदराने झुकते.’

पुण्यातल्या ‘माय लॅब’ डिस्कवरी सोल्युशन्स या कंपनीने कोरोना टेस्ट किट बनवली आहे. Molecular Diagnostics क्षेत्रात या कंपनीचं काम असून अशा विविध आजारांचं निदान करण्यासाठीच्या अनेक किट्स त्यांनी याआधी तयार केल्या आहेत. सध्या भारत जर्मनीमधून Covid-19 च्या टेस्ट किट मागवतो आहे. मात्र जगभरातूनच या किट्सला मागणी असल्याने त्या मिळविण्यात अडचणीही येतात. त्याबरोबर त्या काहीशा महागड्याही आहेत. ही स्वदेशी किट बाहेरच्या किट्सच्या मानाने स्वस्त असल्याची माहिती मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्सचे रणजित देसाई यांनी दिली. “आम्ही एका आठवड्यात एक ते दीड लाख किट्स तयार करू शकतो. यांची किंमत विदेशी किटपेक्षा चौपटीने स्वस्त आहे.”

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of