पुणे महाराष्ट्र

कोरोनामुळे राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन

जुन्नरमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक दिनेश दुबे (वय 58) यांनाही कोरोनाची लागण झाली होती. आज पहाटे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे.

दुबे यांनी जुन्नर नगरपरिषदेचे नगराध्यक्षही भूषावलं होतं. सध्या ते विद्यमान नगरसेवक होते शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते म्हणूनही कार्यरत होते. रविवारी पहाटे दुबे यांचा करोनामुळे पुण्यातील खासगी रूग्णालयात मृत्यू झाला. दिनेश दुबे यांच्या निधनाने जुन्नर शहर व परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.

दिनेश दुबे हे माजी आमदार वल्लभ बेनके, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते विश्वासू सहकारी होते.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of