मनोरंजन महाराष्ट्र

कंगणाने घेतली राज्यपाल कोश्यारी यांची भेट

बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रणौत हिने आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आक्रमक टीका करणारी अभिनेत्री कंगना रणौतवर मुंबई व मुंबई पोलिसांविषयी केलेल्या विधानानंतर टीकेची झोड उठली होती. त्यावरून कंगना विरुद्ध संजय राऊत असं शाब्दिक युद्धही बघायला मिळालं होतं. त्यातच महापालिकेनं अनधिकृत बांधकाम केल्याच्या प्रकरणात कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली. त्यामुळे कंगना भडकली होती.

कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केल्यानंतर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर कंगनानं आज राज्यपालांची भेट घेतली.

‘माझ्यावर जो अन्याय झाला, त्यासंदर्भात मी राज्यपालांची भेट घेतली. मला न्याय मिळेल अशी आशा आहे. मी कोणी राजकारणी नाही, माझं म्हणणं राज्यपालांनी एका मुलीप्रमाणे ऐकून घेतलं,’ अशी प्रतिक्रिया या भेटीनंतर कंगनाने दिली आहे.

 

 

 

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of