महाराष्ट्र मुंबई

राज ठाकरे यांची नवी शक्कल मैदान मिळत नसल्याने…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक नवीन शक्कल शोधून काढली आहे. एकीकडे मैदान मिळत नाही आणि मिळाले तर दुसरीकडे मुसळधार पाऊस यामुळे त्यांनी रस्त्यावर सभा घेण्याची परवानगी निवडणूक आयोगाकडे मागितली आहे.

राज ठाकरेंची पुण्यातील सभा पावसामुळे रद्द करण्यात आली. मतदानाला अवघे काही दिवस राहिले असून परतीच्या पावसाने राजकीय पक्षांची चांगलीचं कोंडी केली आहे. त्याचा पहिला फटका राज ठाकरेंच्या सभेला बसला. पावसामुळे पुण्यातील राज ठाकरेंची पहिली सभा रद्द करावी लागली. त्यामुळेच मनसेने रस्त्यावर सभा घेण्याची परवानगी निवडणूक आयोगाकडे मागितली आहे. त्यावर आता निवडणूक आयोग काय उत्तर देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of