महाराष्ट्र

कधीही पक्षांतर न करता ‘हे’ लोकप्रतिनिधी झाले 11 वेळा आमदार

आपण सध्या पक्ष बदलाचे वारे पाहत आहोत. मात्र असे एक लोकप्रतिनिधी आहेत की, ज्यांनी कधी पक्षांतर केलेले नाही आणि ते 11 वेळा आमदार झालेले आहेत. विशेष म्हणजे भाजपात जात असलेल्या प्रतिनिधींसाठी हे आमदार आदर्श असे उदाहरण आहे.

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार गणपतराव देशमुख हे सांगोला मतदारसंघातून 11 वेळा आमदार झालेले आहेत. गणपतराव देशमुखांनी महाराष्ट्राची पहिली विधानसभा निवडणुक लढवली होती आणि ते जिंकलेही होते. त्यानंतर दोन निवडणूका सोडल्या तर तब्बल ११ वेळा ते आमदार झाले. म्हणजे ५० वर्षांहून अधिक काळ ते विधानसभेचे सदस्य आहेत. या काळात त्यांनी दोन वेळा मुख्यमंत्री म्हणून काम केले. विशेष म्हणजे लोकांच्या हिताची कामे करण्यासाठी ते सातत्याने पुढाकार घेतात. लोकसेवेचा हा वसा ते आजही चालवत आहेत. अगदी मोदी लाटेतही गणपतरावांना लोकांनी आमदार केले.

विरोधी पक्षात राहूनही कामं करता येऊ शकते हे गणपतराव देशमुखांनी दाखवून दिले. मंत्रीपदं गेल्यानंतर लागलीच शासकीय गाड्यांचा त्याग करणाऱ्या गणपतरावांनी आयुष्यभर एसटीनेच प्रवास केला. आजही त्यांचा मतदारसंघातील लोकांसोबतचा संवाद थांबलेला नाही. वयाच्या ९४ व्या वर्षी गणपतरावांनी निवडणूक  न लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र, लोक उमेदवारी अर्ज भरेपर्यंत लोक त्यांच्याकडे निवडणूक लढवावी असा हट्ट धरून बसलेले होते.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of