महाराष्ट्र मुंबई

आता 30 मिनिटात होणार कोरोनाचे निदान; मुंबई महापालिकेचे ‘हे’ खास मिशन

आता कोरोनाचे निदान अवघ्या 30 मिनिटात होणार आहे. यासाठी मुंबई महापालिकेने एक खास मिशन हाती घेतले आहे.

महानगरपालिकेने (BMC) आता “मिशन युनिव्हर्सल टेस्टिंग” हाती घेतलं आहे.  यातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे अवघ्या अर्ध्या तासात कोरोना चाचणीचा अहवाल मिळणार आहे. त्यासाठी अँटीजेन टेस्टिंगच्या (Antigen Tests) एक लाख कीट खरेदी करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. तसेच शासनाने नुकत्याच दिलेल्या मान्यतेनुसार रॅपिड टेस्टींग कीट खरेदी करुन आपल्या कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यास कॉर्पोरेट हाऊसेस, खासगी कंपन्या यांनाही सुचवण्यात आले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने शासन मान्य ॲन्टीजेन कीटच्या 1 लाख कीट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच या कीट उपलब्ध होणार आहेत. हे कीट मुंबईतील महानगरपालिकेची सर्व रुग्णालये, शासन रुग्णालये तसेच कोरोना उपचार केंद्र आदी ठिकाणी उपयोगात येतील. यातून लक्षणे दिसत असलेल्या संशयितांची तातडीने चाचणी करुन संसर्गाला रोखण्याची उपाययोजना अतिशय वेगवान होईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of