महाराष्ट्र

कोल्हापुरात मुसळधार पाऊस; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Kolhapur heavy rainfall

कोल्हापुरात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 75 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पावसाचा जोर पाहता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसंच स्थानिकांनी योग्य वेळी सुरक्षितस्थळी स्थलांतर करावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पंचगंगा नदीची पाणी पातळी  38.5 फुटांवर पोहोचली आहे. तर राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून 11,396 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे. यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. एनडीआरएफच्या तीन तुकड्या येथे तैनातदेखील करण्यात आल्या आहेत.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of