महाराष्ट्र

कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ; एकाच दिवसात 4841 रुग्ण वाढले

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. एकाच दिवसात 4,841 रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या दिड लाखांच्या घरात पोहोचली आहे.

मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 1350 ने वाढला आहे. राज्यात एका दिवसात 192 मृत्यूंची नोंद झाली. यातले 109 मृत्यू मागच्या 48 तासांमधील, तर उरलेले 83 मृत्यू मागच्या कालावधीतील आहेत. सध्याचा राज्यातला मृत्यूदर 4.69 टक्के एवढा आहे. तर दिवसभरात 3 हजार 661 जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील करोना रुग्णसंख्या व बऱ्या झालेल्या रुग्णांची माहिती जाहीर केली. “राज्यात आज 4 हजार 841 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण संख्या आता 1 लाख 47 हजार 741 इतकी झाली आहे. आज (25 जून) नवीन 3 हजार 661 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 77 हजार 453 बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 63 हजार 343 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत,” अशी माहिती टोपे यांनी ट्विट करून दिली.

 

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of