महाराष्ट्र

‘शरद पवार यांच्यामुळेच महाराष्ट्र महाविकास आघाडीचं सरकार आलं’

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळेच महाराष्ट्र महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं असल्याचे नवनिर्वाचित मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.

पाली या ठिकाणी आदिती तटकरे गेल्या होत्या तिथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. विधानसभा निवडणुकीत निवडून आले तेव्हा वाटले नव्हते की सरकार स्थापन होईल. मात्र शरद पवार यांनी दाखवलेल्या जिद्दीमुळे वेगळी समीकरणं जुळली. तसंच राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि एक वेगळा प्रयोग महाराष्ट्रात झाला. तसंच या सरकारमध्ये मला मंत्रिपद मिळालं याचा विशेष आनंद आहे असंही आदिती तटकरे म्हणाल्या.

 

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of