पुणे महाराष्ट्र

मराठा क्रांती मोर्चा पुन्हा आक्रमक; आंदोलनाचा दिला इशारा

मराठा क्रांती मोर्चा पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. ‘उद्या मराठा आरक्षणाची सुनावणी आहे. निकाल विरोधात गेला तर 9 ऑगस्टपासून मराठा क्रांती मोर्चा कोरोना लॉकडाऊनचे निर्बंध पाळून रस्त्यावर उतरेल,’ असा इशारा पुण्यात आज झालेल्या पत्रकार परिषदेतून क्रांती मोर्चाने दिला आहे.

मराठी क्रांती मोर्चाने सारथी संस्थेवरुन राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सारथी संस्थेची स्वायत्तता धोक्यात आणली असून, वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of