महाराष्ट्र

‘भविष्यात मनसे भाजपासोबत जाऊ शकते’

भविष्यात मनसे भाजपासोबत जाऊ शकते असे वक्तव्य मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केले आहे. त्यामुळे राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

मनसेचे पहिलं महाधिवेशन मुंबईत होणार आहे. मनसेच्या झेंड्यात बदल करण्यात आला आहे. तसाच तो धोरणांमध्येही होईल अशीही चर्चा आहे. अशा सगळ्या वातावरणात बाळा नांदगावकर यांनी केलेलं वक्तव्य सूचक आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले की ” यापूर्वी आम्ही शिवसेनेला मदत केली, तसंच भाजपालाही मदत केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीलाही मदत केली. आम्हाला कोणी मदत केली ते सगळ्यांना माहित आहेच. त्यामुळे भविष्यात कुणासोबत जायचं हा निर्णय राज ठाकरे घेतील. राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू नसतो, त्यामुळे लोकांच्या मनात आहे ते घडनाता दिसतं आहे ” असं म्हणत भाजपा आणि मनसे एकत्र येऊ शकतात असे संकेत त्यांनी दिले आहेत

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of