महाराष्ट्र

मराठा आरक्षण प्रकरणी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज मराठा आरक्षण प्रकरणी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलविली आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीबाबत आणि ही स्थगिती उठवण्याबाबतच्या पर्यायांवर चर्चा होणार आहे.

मुंबईतल्या सह्याद्री या सरकारी गेस्ट हाऊसवर संध्याकाळी साडे सहा वाजता ही बैठक होईल. दरम्यान मराठा आरक्षणाला ओबीसी नेत्यांनी जाहीर पाठिंबा दर्शवलाय. मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतलीय. ओबीसी आणि भटक्या विमुक्तांचं आरक्षण कसं बेकायदा आहे हे काही मराठा नेते बोलत आहेत. मराठा समाजाच्या नेत्यांनी ओबीसी आरक्षणाबाबत प्रक्षोभक वक्तव्य करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of