महाराष्ट्र

धनंजय मुंडे यांची कोरोनावर मात; आज मिळाला डिस्चार्ज

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून बाहेर पडताना त्यांनी हात उंचावून आणि हात जोडून रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

धनंजय मुंडे यांना पुढील 14 दिवस घरातच क्वारंटाईन करण्यात येणार आहे. त्यानंतर ते लगेचच कामात रुजू होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, बीड जिल्हा राष्ट्रवादीनं एक ट्वीट केलं आहे. त्यात म्हटलं आहे की, धनंजय मुंडे यांच्याशी व्हिडीओ चाट केलं. ते आता पूर्णपणे बरे झाले आहेत. लवकरच आपलं काम सुरू करणार असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

धनजंय मुंडे यांना श्वास घेताना त्रास होत असल्याने त्यांना 12 जून रोजी तातडीने ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मुंडे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. गेल्या 11 दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर उपचार सुरु होते. आता त्यांची प्रकृती ठिक आहे. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of