महाराष्ट्र

मराठा आरक्षणसाठी सर्व खासदारांनी पंतप्रधान मोदींची भेट घ्यावी

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वपक्षीय खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यावी असे निवेदन त्यांनी सर्वपक्षीय खासदारांना दिले आहे.

संभाजीराजेंनी यासंदर्भात सर्व खासदारांना उद्देशून एक पत्र लिहले आहे. यामध्ये संभाजीराजे यांनी म्हटले आहे की, सर्व खासदारांनी मिळून एकजुटीने आरक्षण प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. आपण जो ठरवाल त्यांच्या नेतृत्वात आपण पंतप्रधानांची भेट घेऊन हा मुद्दा मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असे संभाजीराजे यांनी म्हटले.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of