महाराष्ट्र मुंबई

धक्कादायक; मुंबईत चीन पेक्षा अधिक कोरोना रुग्ण

देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुंबईने कोरोना रुग्णांच्या संख्येत आता चीनलाही मागे टाकलं आहे. चीनमध्ये कोरोनाबाधितांची एकूण संख्या 85 हजार 320 इतकी आहे, तर मुंबईत ही संख्या आता 85 हजार 724 वर पोहोचली आहे.

मुंबईत एकूण 85 हजार 270 कोरोनाग्रस्त रुग्ण असून यापैकी 4 हजार 899 जणांचा मृत्यू झाला आहे. तर चीनमध्ये एकूण 83,565 रुग्ण असून 4,634 जणांचा मृत्यू झाला आहे.

चीनमध्ये सध्या 403, तर मुंबईत 23 हजार 732 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईत 57 हजार 152 रुग्ण कोरोनामुक्त झाले ही दिलासादायक गोष्ट आहे. मात्र रुग्णसंख्या, मृत्यू आणि अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असा सगळ्याच बाबतीत मुंबईने जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनला मागे टाकले आहे. सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असलेल्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या, तर चीन मागे-मागे जात 22 व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of