महाराष्ट्र

जेएनयू मधील हल्ल्याचे मंबई-पुण्यात पडसाद

दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) काल रात्री विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचे मुंबईसह, पुण्यात पडसाद पाहायला मिळाले.

हल्ल्याच्या निषेधार्थ मध्यरात्री मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढला. यामध्ये विद्यार्थी नेता उमर खलिदही सहभागी झाला होता. पुण्यातील एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांची कॅम्पसमध्ये घोषणाबाजी केली. विद्यार्थी संघटनांनी नही सेहेंगे नही सेहेंगे दादागिरी नही सहेंगे च्या जोरदार घोषणा दिल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून JNU मध्ये फी वाढी विरोधात आंदोलन सुरू आहे. त्यातच CAA आणि NRC विरोधात आंदोलन पेटल्याने वातावरण तापलेलं होतं. अशी परिस्थिती असताना रविवारी रात्री विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. डाव्या संघटनांनी अभाविपवर(ABVP) आरोप केलेत तर अभाविपने(ABVP) डाव्या विद्यार्थी संघटनांवर आरोप केला आहे. दोन्ही संघटनांनी आपले विद्यार्थी जखमी झाल्याचा आरोप केलाय. परिस्थिती तणावाची झाल्यानं प्रशासनाने दिल्ली पोलिसांना विद्यापीठाच्या आवारात पाचारण केलं. पोलिसांनी परिसरात फ्लॅग मार्च करत परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र तोंड झाकून आलेले ते गुंड कोण होते हे शोधण्याचं आवाहन आता पोलिसां पुढे आहे. सध्या जेएनयू (JNU)विद्यापीठाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of