महाराष्ट्र

चिंताजनक; महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा 300 पार; 72 रुग्ण वाढले

देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा 300 पार गेला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. आज राज्यात दिवसभरात 72 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. एका दिवसातली आतापर्यंतची सर्वांत मोठी संख्या आहे. आता राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 302 झाला आहे.

एकट्या मुंबई आणि परिसरात (MMR)67 रुग्ण वाढले आहेत. ही एका दिवसातली आतापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे. यातले खुद्द मुंबईतले 59 रुग्ण आहेत. तर पुणे, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, वाशी, विरार इथे प्रत्येकी 2 रुग्ण वाढले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्याचा एकूण आकडा 72 ने वाढला आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of