महाराष्ट्र

पंकजा मुंडेंकडे 800 कोटींचा दारुचा कारखानाः धनंजय मुंडे

आमच्या बहिणीकडे काहीही कमी नाही. त्यांच्याकडे औरंगाबादला दारुचा कारखाना आहे. हा कारखाना तब्बल 800 कोटींचा आहे. असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केला आहे.

अर्धे पैसे लोकसभेला खर्च केले राहिलेले विधानसभेसाठी खर्च करतील अशी जोरदार टीकाही त्यांनी केली. परळी विधानसभा मतदार संघातील बंजारा समाज बांधवांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

एवढी श्रीमंती असताना शेतकऱ्यांचे पैसे कशाला ठेवता असा सवाल त्यांनी पंकजा मुंडे यांना केला. धनंजय मुंडे यांच्या या आरोपावर पंकजा मुंडे यांनी अद्याप आपली प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. यावर आता पंकजा मुंडे काय प्रतिक्रीया देतील याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of