महाराष्ट्र

राज्यात यापुढे लॉकडाऊन नाहीः राजेश टोपे

राज्यात यापुढे लॉकडाऊन नसणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पुण्यात केली आहे.

राज्यात यापुढे लॉकडाउन असणार नाही तर अनलॉक दोन आणि तीन असणार आहे. असे राजेश टोपे म्हणाले आहेत. राज्यात करोनाचे रुग्ण वाढत आहेत याची चिंता फारशी नाही तर राज्यात मृतांची आकडेवारी वाढते आहे त्याची चिंता जास्त आहे असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.

पुणे आणि सोलापुरात कोरोना रुग्ण वाढत आहेत, हे शरद पवार यांनी निदर्शनास आणून दिलं आहे. त्यामुळे मी आणि अनिल देशमुख आढावा घेत असल्याचं राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं. मुंबई आणि पुणे शहरात प्रत्येकी 1लाख अँटी जेन चाचण्या घेतल्या जाणार आहे. त्यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आल्याची घोषणा यावेळी टोपे  यांनी केली आहे.

 

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of