महाराष्ट्र

‘पतंजलीच्या औषधाला राज्यात मान्यता नाही, खोट्या जाहीरातींना नागरिकांनी बळी पडू नये’

पतंजलीने कोरोनावर काढलेल्या औषधाला राज्यात मान्यता नाही त्यामुळे नागरिकांनी या औषधाच्या खोट्या जाहीरातींना बळी पडू नये असे मत राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अमित देशमुख उस्मानाबाद येथे आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.  पुढे बोलताना देशमुख म्हणाले, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या औषधाबाबत जयपूर एम्स सर्व तपासणी करत असल्याचे यापूर्वीच सांगितले आहे. तोवर या औषधांच्या विक्रीला महाराष्ट्रात परवानगी मिळणार नाही, अशी पुरेशी सूचनाही त्यांनी दिली असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख यांनी सांगितले.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of