पुणे महाराष्ट्र

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक ‘दत्ताकाकांचं’ कोरोनामुळे निधन

पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान नगरसेवक आणि महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. साने यांना 25 जून रोजी कोरोनाची लागण झाली होती.

दत्ता साने यांना कोरोनाची लागण तर झालीच होती पण त्याचबरोबर त्यांना निमोनियाची देखील लागण झाली होती. त्यामुळे त्यांची प्रकती आणखीनच खालावली होती. आज अखेर त्यांचं निधन झाले. त्यांच्या निधनाने पुण्यात तसंच पिंपरी चिंचवडमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

चिखली परिसरातून तब्बल तीन वेळा ते निवडून आले. कोरोनाच्या या संकटात त्यांनी गरजूंना खूप मदत केली. अन्नधान्याचं मोठ्या प्रमाणात वाटप केलं. याचवेळी त्यांचा कोरोना रुग्णाशी संपर्क झाला आणि त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण राजकारण क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of