पुणे महाराष्ट्र

अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर ‘या’ नगरसेवकाने दिला राजीनामा

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल राजीनामा दिला. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढविले गेले. त्याच दरम्यान पिंपरी-चिंचवडच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या एका नगरसेवकाने देखील राजीनामा दिला आहे.

नगरसेवक जावेद शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्याकडे त्यांनी या संदर्भातील पत्र दिले आहे.

अजित पवार यांचे बारामतीबरोबरच पिंपरी-चिंचवड शहरावर अतोनात प्रेम आहे. त्यांच्या विकासाभिमुख दृष्टीकोनामुळे अनेक कार्यकर्ते आणि नेते जोडले गेले. परंतु त्यांच्या राजीनाम्यानंतर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जावेद शेख यांनी आपण राजीनामा देत असल्याचे पत्र शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्याकडे दिले आहे. आमचे मार्गदर्शक जिथे नाही, तिथे आम्ही तरी का थांबायचे असे राजीनामा संदर्भात लिहिलेल्या पत्रात त्यांनी नमूद केले आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of