महाराष्ट्र

दिलासादायक; पिंपरी-चिंचवड मध्ये 8 दिवसात कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही

देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये मुंबई सर्वाधिक तर पुण्यातही इतर जिल्ह्यापेक्षा जास्त रुग्ण  आहेत. हे सगळं चित्र असताना पिंपरी-चिंचवड शहरात मात्र गेल्या 8 दिवसात एकही रुग्ण आढळला नसल्याची माहिती समोर आली आहे.

पिंपरी-चिंचवड मधील 5 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत त्यांना घरी सोडण्यात आले. मागच्या दोन दिवसांत शहरातील एकूण 12 कोरोनाग्रस्तांपैकी 8 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर 8 जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत. त्यापैकी 4 जणांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of