महाराष्ट्र

पुण्यात कोरोनामुळे डॉक्टरचा मृत्यू

पुण्यात कोरोनामुळे एका खासगी प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पुण्यात डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना घडली आहे.

संबंधित 59 वर्षीय डॉक्टर गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी लढत होते. मात्र, अखेर त्यांची झुंज अपयशी ठरली. त्यांच्या मृत्यूनंतर कोरोना योद्धांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

पुण्यात डॉक्टरचा कोरोनाने मृत्यू होण्याची पहिलीच घटना आहे. ते ससून रुग्णालयात होते भरती होते. या डॉक्टरांना इतर कोणताही त्रास नव्हता. मात्र कोरोना संसर्ग झाल्याने त्यांची प्रकृती बिघडली होती.

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of