महाराष्ट्र

‘दादा’ पुण्याचे पालकमंत्री तर आदीत्य ठाकरेंकडे मुंबई उपनगरची जबाबदारी

मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता पालकमंत्रीपदाची यादी जाहीर करण्यात आली आहे. पुण्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे तर आदित्य ठाकरे यांची मुंबई उपनगरच्या पालकमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातील मंत्र्यांची पालकमंत्री म्हणून नियुक्त्या केल्या आहेत.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सांगली, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर कोल्हापूरची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी पुढीलप्रमाणे:-

पुणे- श्री. अजित अनंतराव पवार

मुंबई शहर- श्री. अस्लम रमजान अली शेख

मुंबई उपनगर- श्री. आदित्य उद्धव ठाकरे

*ठाणे*- श्री. एकनाथ संभाजी शिंदे

*रायगड* – श्रीमती आदिती सुनिल तटकरे

*रत्नागिरी*- ॲड. अनिल दत्तात्रय परब

*सिंधुदुर्ग*- श्री. उदय रविंद्र सामंत

*पालघर*- श्री. दादाजी दगडू भुसे

*नाशिक*- श्री. छगन चंद्रकांत भुजबळ

*धुळे*- श्री. अब्दुल नबी सत्तार

*नंदुरबार*- ॲड. के.सी. पाडवी

*जळगाव*- श्री. गुलाबराव रघुनाथ पाटील

*अहमदनगर*- श्री. हसन मियालाल मुश्रीफ

*सातारा*- श्री. शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील

*सांगली*- श्री. जयंत राजाराम पाटील

*सोलापूर*- श्री. दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील

*कोल्हापूर*- श्री. विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात

*औरंगाबाद*- श्री. सुभाष राजाराम देसाई

*जालना*- श्री. राजेश अंकुशराव टोपे

*परभणी*- श्री. नवाब मोहम्मद इस्लाम मलिक

*हिंगोली*- श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड

*बीड*- श्री. धनंजय पंडितराव मुंडे

*नांदेड*- श्री. अशोक शंकरराव चव्हाण

*उस्मानाबाद*- श्री. शंकरराव यशवंतराव गडाख

*लातूर*- श्री. अमित विलासराव देशमुख

*अमरावती*- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)

*अकोला*- श्री. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू

वाशिम- श्री. शंभुराज शिवाजीराव देसाई

बुलढाणा- डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे

यवतमाळ- श्री. संजय दुलीचंद राठोड

नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत

वर्धा- श्री. सुनिल छत्रपाल केदार

भंडारा- श्री. सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील

गोंदिया- श्री. अनिल वसंतराव देशमुख

चंद्रपूर- श्री. विजय नामदेवराव वडेट्टीवार

गडचिरोली- श्री. एकनाथ संभाजी शिंदे

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of