महाराष्ट्र

वृक्षतोडीनंतर आरे परिसरात कलम 144 लागू

आरे परिसरात काल रात्री वृक्षतोड केल्यामुळे पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले आहेत. यापार्श्वभूमीवर या परिसरात कलम 144 लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.

आरेतील मेट्रो कारशेड उभारण्यात येणाऱ्या परिसरातील झाडं कापल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पर्यावरण प्रेमींकडून आंदोलन करण्यात आलं होतं. मेट्रो 3 प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोड करण्याच्या विरोधातील याचिका फेटाळल्यानंतर महापालिकेने पोलिसांच्या मदतीने रातोरात जवळपास 700 झाडांवर कुऱ्हाड चालवली. ही माहिती मिळताच पर्यावरणप्रेमींनी ‘आरे’त धाव घेतली आणि ठिय्या आंदोलन केले. आंदोलन आणि आक्रमक पवित्र्यानंतरही झाडांची कत्तल थांबली नाही. पर्यावरण प्रेमींना न जुमानता पोलीस आणि प्रशासनाने कारवाई केली. आंदोलन करणाऱ्या जवळपास 100 जणांना पहाटेच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी आरेचा रस्ताही वाहतुकीसाठी बंद केला. सध्या या परिसरात जाण्यासाठी पोलिसांनी बंदी घातली असून कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of