sharad pawar criticized on uadayan raje bhosale
महाराष्ट्र

पळपुट्या नेत्यांचा आता जनताच समाचार घेईलः शरद पवार

राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये दाखल झालेल्या उद्यनराजे भोसले यांचा आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खरपुस समाचार घेतला आहे.

लोकांच्या पाठिंब्यावर निवडून आलेले नेते पळपुटे निघाले, असं म्हणत त्यांनी उदयनराजेंवर निशाणा साधला आहे. पळपुट्या नेत्यांचा आता जनताच समाचार घेईल. सोडून गेलेले नेते जनतेच्या विकासासाठी नव्हे तर स्व:ताची कातडी वाचवण्यासाठी गेले आहेत, असा घणाघातही शरद पवार यांनी केला.

नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा मेळावा रविवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी उदयनराजेंचं प्रत्यक्ष नाव घेणं टाळलं मात्र त्यांनी अप्रत्यक्षपणे उदयनराजेंना लक्ष्य केलेलं दिसून आलं. “ज्या सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या वाढल्या, बेरोजगारी वाढली. त्या पक्षात काही लोक सत्तेसाठी जात आहेत”, अशा शब्दात पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्यांचा समाचार घेतला.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of