महाराष्ट्र

‘माझं ते माझं तुझं ते माझ्या बापाचं असं भाजपाचं राजकारण आहे’

माझं ते माझं तुझं ते माझ्या बापाचं असं भाजपाचं राजकारण आहे  असा टोला शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपाला लगावला आहे.

लोकमत आयोजित पुरस्कार कार्यक्रमात संजय राऊत बोलत होते. यावेळी त्यांनी दिलखुलास बातचीत केली. माणूस मृत्यूला किंवा तुरुंगात जायला घाबरतो. पण मी कशालाही घाबरत नाही. त्यामुळे कुणालाही घाबरण्याचा प्रश्नच येत नाही, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

“भाजपावाले दिलेला शब्द पाळणार नाही याची सर्वात आधी खात्री मला होती. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावरच हे मला कळलं होतं. माझं ते माझं तुझं ते माझ्या बापाचे आहे असं भाजपाचं राजकारण सुरु आहे,” अशी टीका त्यांनी यावेळी भाजपावर केली.

राज्यामध्ये सध्या असलेले महाविकास आघाडी सरकार हे पूर्ण विचार करुनच सत्तेत आले आहे असं राऊत यांनी स्पष्ट केलं. “आत्ता आलेलं सरकार हे टेस्ट ट्युब बेबी नाही. हे व्यवस्थित जन्माला घातलेलं सरकार आहे. याबद्दल आम्ही बऱ्याच आधीपासून प्लॅनिंग केलं होतं,” असंही राऊत यांनी सांगितलं.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of