महाराष्ट्र

नवा मोटार वाहन कायदा तुर्तास महाराष्ट्रात लागू नाहीः परिवहन मंत्री

diwakar raote

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी लागू केलेला नवा मोटार वाहन कायदा तुर्तास महाराष्ट्रात लागू होणार नाही अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना भरमसाठ दंडाची तरतूद या नव्या कायद्यात असल्याने त्याला सर्वसामान्य नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध होताना दिसत आहे. तसेच पुढील महिन्यांत विधानसभा निवडणुका लागणार असल्याच्या पार्श्वभूमीवर रावते यांनी  हा निर्णय जाहीर केला.

मोटार वाहन कायद्यासंदर्भात केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यानुसार नवीन मोटार वाहन कायद्याला राज्यात तुर्तास स्थगिती दिल्याचे रावतेंनी सांगितले. या कायद्यासंदर्भात राज्यानं कोणतीही भूमिका घेतलेली नाही. या कायद्याच्या बाबतीत राज्य सरकार तटस्थ आहे. यासंदर्भामध्ये आम्ही जोपर्यंत नोटिफिकेशन काढत नाही, तोपर्यत या कायद्याची राज्यात अंमलबजावणी होणार नाही. तरीही अशा प्रकारे कोणी दंडवसुली करत असल्यास वाहन चालक कोर्टात जाऊ शकतात, असं रावतेंनी सांगितलं आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of