महाराष्ट्र

मराठा समाजाला न्याय मिळणारचं! मोर्चे काढू नकाः मुख्यमंत्री

मराठा समाजाला न्याय मिळणार आहे. त्यामुळे मराठा समाजाने आपल्या सरकारविरोधात मोर्चे काढू नये असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केले आहे. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात राज्य सरकारने पूर्ण ताकदीने बाजू मांडली आहे. पण मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. आत जी गरजेची स्थगिती नव्हती, ती देण्यात आली आहे हे अनाकलनिय आहे, असं स्पष्ट मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आहे.

‘मराठा आरक्षणाची तुमची जी भावना आहे, तीच आमचीही भावना आहे. तुमच्या मागण्या या राज्य सरकारच्या मागण्या आहे. मराठा आरक्षणासाठी सरकार कोर्टात लढा देत आहे. मराठा समाजाच्या सर्व सुचनांचा विचार करून रणनीती आखत आहे.  सरकार मराठा समाजासोबत आहे. त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितीत आंदोलन काढू नका, तुम्हाला न्याय मिळवून देणे यासाठी सरकार कटीबद्ध आहे.  मराठा समाजाने अफवांना बळी पडू नये, कुणाच्या बोलण्यात येऊ नये. गैरसमज पसरवू नका, असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी केले.

 

 

 

 

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of