महाराष्ट्र

म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केली नाराजी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनाकारण वाहने घेऊन फिरणाऱ्यांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे, तरी देखील मुंबई परिसरातील अनेक नागरिक घराबाहेर वाहने काढून फिरताना दिसत आहे, हे अजिबात अपेक्षित नसल्याचे वक्तव्य उध्दव ठाकरे यांनी केले आहे.

कोरोनाची साथ जी आपण आटोक्यात ठेवली आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढून आपल्यासमोर आव्हान उभे राहील. पावसाळा, कोरोना तसेच मुंबईसंदर्भातील इतर नागरी समस्यांवर आयोजित व्हिडीओ कॉन्फरन्स बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला खासदार अनिल देसाई, परिवहन मंत्री अनिल परब, आमदार सुनील प्रभू यांनीही बैठकीत सहभाग घेऊन सूचना केल्या. बैठकीस मुख्य सचिव अजोय मेहता, एमएमआरडीए आयुक्त आर राजीव, बृहन्मुंबई पालिकेचे अधिकारी देखील उपस्थित होते.

“आपण अनलॉकमधील नियमांनुसार कार्यालयांमध्ये जात असाल, दवाखाने किंवा इतर आवश्यक कारणांसाठी जाणे गरजेचे असेल, तर तुम्हाला कुणी अडवणार नाही. पण कोणतेही कारण नसताना फिरायला गेल्यासारखे बाहेर पडत असाल. वाहनांची गर्दी होणार असेल, तर तुम्ही स्वत:चा आणि इतरांचाही धोका वाढवीत आहात, हे लक्षात ठेवा. असे मत उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

 

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of