महाराष्ट्र

‘काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणतात, बहुमत नसताना सरकार येणार ते कसं येणार’

बहुमत नसताना सरकार आमचंच येणार असे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणतात, पण ते कसं येणार असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. चर्चा आमच्याकडून नाही तर शिवसेनेकडून बंद झाली’ असं म्हणत शिवसेनेवर टीका केली. इतकंच नाही तर पुढचं सरकारही भाजपाचंच असेल असंही त्यांनी ठासून सांगितलंय. यानंतर काही वेळेतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेतली. आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

काय म्हणाले उध्दव ठाकरे..

त्यांच्या अचाट कामाबद्दल धन्यवाद

– आम्ही राहिलो नसतो तर ही कामे झाली असती का? कामाआड आम्ही कधी आलो नाही

– विचार करून आम्ही शब्द देतो

– टीकेची पर्वा न करता जनतेची बाजू मांडत आलो

– दु:ख झाले की या परिवारावर म्हणजे माझ्यावर खोटारड्यापणाचा आरोप केला

– देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहांचा आधार घेवून माझ्यावर खोटेपणाचा आरोप केला.

– उपमुख्यमंत्रीपद देऊ केले होते पण मी लाचार नसल्याचे सांगितले

– बाळासाहेबांना वचन दिल्याप्रमाणे मुख्यमंत्रीपद हवं असल्याचं अमित शाह यांना सांगितलं होतं

– अमित शहांना समसमान पद वाटपही करावं असं सांगितलं होतं. अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद त्यांनी मान्य केले मग ते मातोश्रीवर आले.

– देवेंद्रजीना हे सांगितले गेले होते.

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of