महाराष्ट्र

आमचा रंग भगवा, अंतरंगही भगवाचः उध्दव ठाकरे

“गेली 25-30 वर्षे जे आपले विरोधक होते. त्यांचा हातात हात घेऊन मी सरकार स्थापन केलं. उघडपणे केलं. चोरुन मारुन केलेले नाही. याचा अर्थ मी भगवा खाली ठेवला असा नाही. ना आमचा रंग आम्ही बदलला ना आमचा अंतरंग आम्ही बदलला. आमचा अंतरंगही भगवाच आहे आणि आमचा रंगही भगवाच आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना लगावला आहे.”

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेनेच्या वचनपूर्ती सोहळ्याचे आयोजन केले  होते. आज वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उध्दव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर निशाणा  साधला.

“माझा सत्कार करण्यात आला. पण मी मनापासून सांगतो. ही नवी जबाबदारी घेतल्यानंतर मी एकही सत्कार स्वीकारला नाही. पण मी हा मुद्दाम स्वीकारला. कारण हा माझा सत्कार नाही तर तुमचा सत्कार आहे. मी नक्कीच तुमचा कुटुंब प्रमुख सेनापती आहे. मैदानात उतरल्यानंतर जी जबाबदारी माझ्यावर येईल. त्यापासून मी कधीही पळ काढलेला नाही किंवा काढणार नाही.”

मुंबईत शिवसेनेचा वचनपुर्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार  मंत्री आदित्य ठाकरे यांचाही सत्कार करण्यात आला. शिवसेनेतील ज्येष्ठ शिवसैनिकांच्या हस्ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कारानंतर सगळ्यांना मंचावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केलं. या सत्कार सोहळ्याच्या वेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली

 

 

 

 

 

 

 

 

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of