महाराष्ट्र

शपथविधीला गैरहजर राहिल्याचा संजय राऊत यांनी केला खुलासा

महाविकास आघाडीचा काल मंत्रिमंडळ विस्तार पार पडला.  मात्र शिवसेनेचे नेते संजय राऊत हे मंत्रिमंडळ विस्ताराला गैरहजर होते. त्यांचे बंधू सुनिल राऊत यांना मंत्रिपद नसल्याने संजय राऊत नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र आता खुद्द संजय राऊत यांनी ते का गैरहजर राहिले याचे कारण सांगितले आहे. आपण कोणत्याही शासकीय कार्यक्रमाला जात नसल्यानेच गैरहजर होतो असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

इतक्या वर्षात मी शक्यतो कोणत्याही शासकीय कार्यक्रमाला गेलेलो नाही’ असं संजय राऊत म्हणाले. त्यावर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला उपस्थित राहिल्याबद्दल पत्रकारांनी त्यांना विचारलं. तेव्हा, उद्धव ठाकरेंचा शपथविधी अपवाद होता, ते राज्याचे मुख्यमंत्री झाले होते, असं राऊतांनी सांगितलं. मंत्रिमंडळ विस्तारावर कोणतीही नाराजी नसल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of