महाराष्ट्र

अजित पवारांच्या घोषणेनंतर अवघ्या दोन तासांतच ‘सारथी’ला 8 कोटींची मदत

सारथी संस्थेबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अवघ्या दोन तासांतच सारथी संस्थेला 8 कोटींची मदत जाहीर केली आहे. अजित पवारांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे.

मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी स्थापन झालेली ‘सारथी’ संस्था कदापि बंद होणार नाही. समाजबांधवांच्या शाश्वत विकासासाठी ‘सारथी’कडून ‘व्हिजन 2020-30’ हा दहा वर्षांचा आराखडा तयार केला जाईल. तसेच ‘सारथी’वरचे हेत्वारोप टाळून बदनामी थांबवावी, असं आवाहन अजित पवारांनी केलंय.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी 11 वाजता मंत्रालयातील त्यांच्या दालनात खासदार छत्रपती संभाजीराजे व मराठा समाज प्रतिनिधींची बैठक घेतली. दुपारी दिड वाजता पत्रकार परिषदेत 8 कोटी देत असल्याचे जाहिर केले. त्यानंतर अवघ्या दोन तासात म्हणजे साडेतीन वाजण्याच्या सुमारास इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने पत्र क्र.संकिर्ण 2019/प्र.क्र.117/महामंडळे, दि. 9 जुलै 2020 निर्गमित करण्यात आले असून त्याद्वारे सुमारे 7 कोटी 94 लाख 89 हजार 238 रुपये इतका निधी ‘सारथी’ संस्थेला तातडीने उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of