मुंबई

कामा इंडस्ट्रीला भीषण आग; करण जोहरचे धर्मा प्रोडक्शनचं गोदाम जळून खाक

गोरेगाव येथे कामा इंडस्ट्रीमध्ये मध्यरात्री 2.30 च्या सुमारास भीषण आग लागली आहे. या आगीत करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या गोदामाला ही आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 12 हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तब्बल 5 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेची चौकशी केली जाईल अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of