मुंबई

धक्कादायक; दहावीच्या विद्यार्थ्यांचा चक्कर येऊन मृत्यू

दहावीच्या विद्यार्थ्यांचा शाळेत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रकृती ठीक नसल्यामुळे चक्कर येऊन त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेचा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सौम्य संजय भटनागर (15) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो नेरुळच्या पोदार शाळेत शिकत होता. शुक्रवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता. यावेळी तो चक्कर येऊन पडल्याने बेशुध्द झाला होता. यामुळे त्याला डी.वाय.पाटील रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याची प्रकृती ठिक नसतानाही तो शाळेत गेला होता. यावेळी चक्कर आल्याने तो खाली कोसळून त्यातच मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of