मुंबई

रमजानच्या काळात मतदान पहाटे पाच वाजता सुरु होणार ?

लोकसभा निवडणूकीतील उर्वरीत तीन टप्प्यांमधील मतदानाच्या काळात रमजान सुरु होणार आहे. या तीन टप्प्यामधील मतदानाची प्रक्रीया सकाळी सात ऐवजी पहाटे 5 वाजता सुरु करावी अशी याचिका मुस्लीम संघटनांनी सुप्रीम कोर्टात दाखल केल्या आहेत.

या जनहित याचिकांवरील सुनावणी दरम्यान निवडणूक आयोगाने योग्य तो निर्णय घ्यावा असे आदेश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिलेले आहेत. ६, १२ आणि १९ मे रोजी उर्वरित तीन टप्प्यांमधील मतदान होणार आहे. यंदा ५ किंवा ६ मेपासून रमजानला सुरुवात होणार आहे.

त्यामुळे या याचिकांवर निवडणूक आयोग काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of