मुंबई

‘या’ तारखेला होणार मंत्रिमंडळाचा विस्तार

महिन्याभरापासून प्रलंबित असणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा अखेर मुहुर्त ठरला आहे. येत्या सोमवारी (30 डिसेंबरला) मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी शपथविधीच्या जागेसाठी संमती दिली असून सोमवारी दुपारी एक वाजता हा महाशपथविधी सोहळा पार पडणार आहे.

राजभवनात दरबार हॉलचे काम चालू असल्यामुळे शपथविधी विधानभवन समोरील मोकळ्या जागेत केला जाईल असे राजशिष्ठाचार विभागातील अधिकाऱ्यांची स्पष्ट केले. मंत्रिमंडळ विस्तारासाठी सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती असल्यानेच विधिमंडळ परिसरात मोठी मोकळी जागा शपथविधीसाठी निश्चित करण्यात आली आहे.

शिवसेनेला 15 मंत्रीपदे व एक मुख्यमंत्रीपद, राष्ट्रवादीला 15 मंत्रीपदे व एक उपमुख्यमंत्रीपद आणि विधानसभेचे उपाध्यक्षपद तर काँग्रेसला 12 मंत्रीपदे आणि विधानसभेचे अध्यक्षपद अशी विभागणी या तीन पक्षात झाली आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of