महाराष्ट्र मुंबई

अबब भिक मागणाऱ्या व्यक्तिकडे सापडले लाखों रुपये

मुंबईतील गोवंडी परिसरात भीक मागून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या एका व्यक्तिच्या घरात चक्क 12 पोती भरुन चिल्लर सापडल्याची माहिती आहे. ही रक्कम चार ते पाच लाख रुपये असण्याची शक्यता पोलिस व्यक्त करीत आहेत.

गोवंडी रेल्वे स्थानक परिसरात गेल्या अनेक वर्षापासून भीक मागून आपला उदनिर्वाह करणाऱ्या एका व्यक्तीचा ४ ऑक्टोबर रोजी रेल्वे अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर त्याची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या तपासात मोठी माहिती समोर आली आहे. या व्यक्तीची बँकांमध्येही खाती असल्याची माहिती समोर आली आहे. या खात्यांमध्ये तब्बल २० ते २५ लाखांची रक्कम जमा असल्याची माहितीही पोलीस सूत्रांकडून देण्यात आली.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of