पुणे महाराष्ट्र

गड किल्ल्यांना नखही लागू देणार नाहीः देवेंद्र फडणवीस

cm devendra phadanvis

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांना नखही लागू देणार नाही असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात केले.

गड किल्याचे संवर्धन भाजपनेच केले आहे. ज्याप्रमाणे रायगडाचा विकास केला. त्याचप्रमाणे इतर किल्ल्यांचा विकास करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

गडकिल्ले लग्नसोहळ्यांसाठी भाड्याने देण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पर्यटन मंत्रालयाने राज्यातील २५ किल्ले लग्नसमारंभ आणि इतर कार्यक्रमांसाठी भाड्याने देण्याचा निर्णय घेतल्याच्या वृत्तामुळे शुक्रवारी चांगलाच गदारोळ झाला. यावरून अनेकांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात प्रसार माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of