पुणे महाराष्ट्र

भिडे पुलावर स्टंटबाजी करणारा तरुण वाहून गेला

bhide bridge

स्टंटबाजी तरुणाच्या अंगलट आली आहे. पुण्यातील बाबा भिडे पुलावर दोन तरुण स्टंटबाजी करीत होते त्यातील एकजण पाण्यातील प्रवाहाबरोबर वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

धरणसाखळीत संततधार पावसामुळे खडकवासला धरणातून 18 हजार 500 क्‍युसेकने पाणी प्रवाह नदीपात्रात सोडण्यात येत आहे. नदीपात्रात पाण्याचा प्रवाह पाहण्यासाठी प्रकाशसिंह श्रीभवन लोहरा (वय 20, रा. उत्तराखंड) आणि असिम अशोक उकील (वय 18, रा. कलकत्ता) असे दोघे तरुण सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भिडे पुलाजवळ आले होते. प्रकाश व असिमने पुलावरुन उडी मारण्याची शर्यत लावली होती. दोघांनी उडी मारल्यावर असिम बाहेर आला मात्र प्रकाश बेपत्ता झाला. दरम्यान, नदीपात्रालगत विसर्जनासाठी असलेल्या जवानांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो हाती लागला नाही. दोघेही तरुण नारायण पेठेतील “दावत ए कबाब’ या हॉटेलमध्ये कामास आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of