क्रीडा

ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋषभ पंतला चौथ्या क्रमांकावर खेळवा : गावस्कर

मुंबई

दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या मते विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघात मधल्या फळीत डाव्या हाताचा फलंदाज असणे आवश्यक आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील सामन्यांमध्ये युवा खेळाडू ऋषभ पंत याला चौथ्या किंवा पाचव्या स्थानी फलंदाजीसाठी संधी द्यावी असे मत गावस्कर यांनी व्यक्त केले आहे.

त्याला संधी दिल्याने विश्वचषक स्पर्धेपूर्वी हा खेळाडू फलंदाजीत कसा आहे, हे कळेल. तसेच अतिरिक्त सलामीवीर फलंदाज म्हणून दिनेश कार्तिक योग्य असल्याचे देखील गावस्कर यांनी सांगितले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात डाव्या हाताचा फलंदाज पंत याला फलंदाजी करताना पाहणे आवश्यक असल्याचे गावस्कर म्हणाले.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of