क्रीडा

केदार जाधवने घेतले दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन

indian cricketer kedar jadhav

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू केदार जाधवने आज (शुक्रवारी) दुपारी पुण्यातील प्रसिध्द श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले आहे. यावेळी केदारने गणपती बाप्पाची आरती केली. केदारला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

केदार जाधव आपल्या कुटुंबियासोबत दर्शनाला आला होता. त्याने आपल्या आई-वडिलांच्या निरोगी आरोग्यासाठी प्रार्थना केली. भारतीय क्रिकेट संघाने मिळवलेल्या यशाबद्दल केदारने यावेळी बाप्पाचे आभार मानले. मला बाप्पाने काही न मागता अनेक गोष्टी दिल्या आहेत. अशी भावना यावेळी केदारने पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of