क्रीडा

ख्रिस गेलच्या जागी ‘हा’ वजनदार खेळाडू टीम इंडिया विरुध्द करणार पदार्पण

भारत आणि विंडीज यांच्यातील टी20 मालिका भारतानं 3-0 ने जिंकली. त्यानंतर आता एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली आहे. यातील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर आता दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. यासाठी वेस्ट इंडिज संघाने शनिवारी 13 सदस्यांचा संघ जाहीर केला. त्यांनी 26 वर्षीय राहकीम कोर्नवॉलला कसोटीत खेळण्याची संधी दिली आहे, तर अनुभवी फलंदाज ख्रिस गेलला वगळले आहे.

22 ऑगस्टपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतून 6 फुट उंच आणि 140 किलो वजनाचा वजनदार कोर्नवॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. या 26 वर्षीय खेळाडूने स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. पण, त्याला तंदुरुस्तीच्या कारणास्तव संघात स्थान दिले गेले नव्हते. पण, आता टीम इंडियाविरुद्धच्या कसोटी संघात त्याला संधी मिळाली आहे आणि तोही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणासाठी सज्ज झाला आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of