क्रीडा

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी ‘हे’ 6 जण रिंगणात

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी रवी शास्त्री यांच्यासह ‘या’ सहा जणांची नावे मुलाखतीसाठी निश्चित करण्यात आली आहे. अर्ज पाठवलेल्यांपैकी ६ जणांची मुलाखत कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालची क्रिकेट सल्लागार समिती घेणार आहे.

या उमेदवारांमध्ये भारताचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचेही नाव आहे. याचबरोबर न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन, ऑस्ट्रेलियाचे माजी ऑलराऊंडर आणि श्रीलंकेचे माजी प्रशिक्षक टॉम मूडी, वेस्ट इंडिजचे माजी ऑलराऊंडर आणि अफगाणिस्तानचे प्रशिक्षक फिल सिमन्स, टीम इंडियाचे माजी व्यवस्थापक लालचंद राजपूत, टीम इंडियाचे माजी फिल्डिंग प्रशिक्षक रॉबिन सिंग हेदेखील मुलाखत देणार आहेत.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of