क्रीडा

त्याला उत्कृष्ट फलंदाजीपेक्षा काच फुटल्याचे दुःख झाले

आयर्लंडचा फलंदाज केविन ओब्रायन एका स्थानिक टी-20 सामन्यात दमदार फलंदाजी करत होता. मात्र, त्याने मारलेल्या उत्तुंग षटकारामुळे त्याच्याच गाडीची काच फुटली. त्याने फक्त 37 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 82 धावांची आक्रमक खेळी केली. मात्र त्याला त्याच्या गाडीचे नुकसान झाल्याने खेळीच्या आनंदापेक्षा काच फुटल्याची निराशा जास्त झाली.

ओब्रायनने फटकावलेला षटकार स्टेडियमच्या बाहेर गेला व त्याच्याच गाडीच्या काचेवर आदळला व गाडीची काच फुटली. लेनस्टर लाईटनिंग विरुद्ध नॉर्थ-वेस्ट वॉरियर्स या सामन्यात ओब्रायन लाईटनिंग संघाकडून खेळत होता. ओब्रायनच्या खेळीने लाईटनिंग संघाने हा सामना 24 धावांनी जिंकला.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of